सभापतीपदी अनुश्री कांबळी तर उपसभापतीपदी सिद्धेश परब बिनविरोध…
वेंगुर्ले.ता,२६:
वेंगुर्ले पंचायत समितीच्या सभापतीपदी अखेर महाविकास आघाडीच्या अनुश्री कांबळी यांची तर उपसभापतीपदी सिद्धेश उर्फ भाई परब यांची बिनविरोध निवड झाली आहे.
वेंगुर्ले पंचायत समितीमध्ये सभापतिपदाच्या अडीच वर्षाचा कार्यकाल संपल्यानंतर नव्या आरक्षणानुसार आज सभापती व उपसभापती या पदांची निवडणूक जाहीर झाली होती. त्यामुळे आज प.स. कार्यालयात सकाळी सभापतीपदासाठी अनुश्री कांबळी यांचा आणि उपसभापती पदासाठी भाई परब यांचा प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार प्रविण लोकरे यांनी काम पाहिले. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी उमा पाटील, नायब तहसीलदार संतोष बादेकर, कृषी विस्तार अधिकारी विद्याधर सुतार यांनी काम पाहिले. दरम्यान महविकास आघाडीच्या उमेदवारांची बिनविरोध निवड होताच शिवसेना, काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख यशवंत परब, सुनील डूबळे, सचिन देसाई, अजित सावंत, अजित राऊळ, उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, काँग्रेसचे माजी सदस्या चित्रा कनयाळकर, इर्शाद शेख, नगरसेवक प्रकाश डीचोलकर, कृतीका कुबल, स्नेहल खोबरेकर प.स. सदस्या साक्षी कुबल तसेच नितीन मांजरेकर, समाधान बांदवलकर, पंकज शिरसाठ, सुकन्या नरसुले, बाळा दळवी, आबा कोंडस्कर, महेश सामंत यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.