खून केल्याप्रकरणी वजराठ येथील पितापुत्राला जन्मठेप

2

ओरोस ता २६: 
काजूच्या झाडासाठी झालेल्या वादाच्या रागातून विलास बाळकृष्ण सावंत यांचा खून केल्याचा आरोप असलेल्या वजराट पिंपळगांव येथील दिगंबर गुंडू सावंत (वय 71) आणि गुंडू दिगंबर सावंत (वय 38) या पिता पुत्राला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यानी
दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी अभियोक्ता संदेश तायशेटे यानी काम पाहिले. तर फिर्यादि आणि मयत विलास यांचा मुलगा ओमप्रकाश यांच्या बाजूने वकील आर एस गवाणकर यानी सरकार पक्षाला सहाय्य केले.
मयत विलास आणि आरोपी दिगंबर यांच्यात भाऊ बंदकितील जमीन जागेवरुन वाद होते. 11 नोव्हेंबर 2018 रोजी विलास हे वेंगुर्ला तालुक्यातील वजराट गावातील पिंपळगांव येथील विहिरिवर सायंकाळी 5.30 च्या सुमारास पाणी आणण्यासाठी गेले होते. तेथून पाणी घेऊन येत असताना आरोपी दिगंबर आणि गुंडू यानी त्यांच्यावर काजूच्या झाडावरुन झालेल्या रागातून दांड्याने मारहाण केली होती. या मारहाणीत विलास गंभीर जखमी झाले होते. त्याना उपचारासाठी तातडीने गोवा बांबुळी येथील वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले होते. 12 रोजी पहाटे 3.30 वाजता उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले होते.

4