घरोघरी प्रचारावर भर; विकासाच्या मुद्यावर लढणार निवडणूक…
सावंतवाडी ता.२६: नगराध्यक्ष पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार संजू परब यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.उत्कृष्ट संघटन कौशल्य,युवा वर्गाचा वाढता प्रतिसाद पाहून ते विजयाच्या दिशेने वाटचाल करीत असल्याची चर्चा सुरू आहे.तसेच अनेक निवडणुकीत यश संपादन करण्यासाठी ते कायमच आघाडीवर होते.सावंतवाडीच्या विकासासाठी सातत्याने झटणाऱ्या संजू परब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत युवावर्ग मोठ्या संख्यने प्रचारात दाखल होत आहे,असे जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष नगरसेवक मनोज नाईक यांनी सांगितले.
सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या संजू परब यांची जनतेच्या मनात युवा समाजसेवक म्हणून ओळख आहे.त्यांना मानणारा वर्ग अवघ्या सावंतवाडी विधानसभा मतदार संघात आहे;पण जनतेचे हीत जोपासण्यासाठी सावंतवाडी नगराध्यक्ष पदाची निवडणुक लढविण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे,असे नाईक यांनी सांगितले.
भाजप पक्षाच्या माध्यमातून त्यांनी विकासाचे धोरण निश्चित केले आहे.शहरातील पायाभूत सुविधा, ब्रँड सावंतवाडी, ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा केंद्र, क्रीडा धोरण, प्लास्टिकमुक्त सावंतवाडी, अशा शहर विकासाबद्दल मांडलेल्या विविध मुद्द्यांच्या पत्रकातून सावंतवाडीच्या सर्वांगीण विकासाचे व्हिजन मांडले आहे. संजू परब यांना नगराध्यक्षपदी विराजमान केल्यास ते सावंतवाडीला एका उंचीवर नेऊन ठेवतील यात तिळमात्र शंका नाही, असेही मनोज नाईक म्हणाले.