सर्व केशकर्तनालयात १ जानेवारी पासून दरवाढ…

2

वेंगुर्ले तालुका नाभिक संत सेना महाराज मंडळाच्या बैठकीत निर्णय…

वेंगुर्ले ता.२६: वेंगुर्ले तालुका नाभिक संत सेना महाराज मंडळाची बैठक नुकतीच परबवाडा-पवारवाडी येथील ब्राह्मण मंदिरात संपन्न झाली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. विशेष म्हणजे १ जानेवारी पासून केशकर्तनालयातील दरवाढ करण्याचा निर्णय सर्वांनी एकमताने घेतला.
वेंगुर्ले तालुका नाभिक संत सेना महाराज मंडळ अध्यक्ष किरण पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी ज्येष्ठ समाज बांधव आप्पा पवार यांनी न्याती मधील समस्यांबाबत व त्यावरील उपायांबाबत मार्गदर्शन केले. प्रास्ताविक शंकर पवार यांनी तर आभार राजेश पवार यांनी मानले. बैठकीला राधाकृष्ण पवार, आनंद माणगावकर, रुपेश आडारकर, जयराम आडारकर, प्रसाद पवार, नाना पवार, तुळशीदास पवार, अजित पवार, विश्वास पवार, रुपेश अणसुरकर, हेमंत वेंगुर्लेकर, प्रसाद वेंगुर्लेकर, दर्शन अणसुरकर, सचिन आडारकर, प्रसाद तुळसकर, मंदार मटकर, महेश आडारकर आदि उपस्थित होते. वाढती महागाई लक्षात घेता सर्व केशकर्तनालयात १ जानेवारी पासून दरवाढ करण्यात आली आहे. तरी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन तालुकाध्यक्ष किरण पवार यांनी केले आहे.

4