कुडाळ पंचायत समितीवर दुसऱ्यांदा शिवसेनेचा भगवा…

2

सभापतीपदी नूतन आईर तर उपसभापतीपदी जयभारत पालव यांची निवड…

कुडाळ ता.२६: येथील पंचायत समितीच्या सभापती निवडणुकीत अखेर शिवसेनेचा भगवा फडकला आहे.या निवडणुकीत सभापतीपदी नूतन आईर तर उपसभापतीपदी जयभारत पालव यांची वर्णी लागली आहे.दरम्यान या मतदान प्रक्रियेत,तेरा विरुद्ध सात असे मतदान झाले.
कुडाळ पंचायत समितीवर दुसऱ्यांदा शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला आहे.यामध्ये सभापती सौ.आईर व उपसभापती श्री.पालव विजयी झाले. या निवडणुकीसाठी सकाळपासून आमदार वैभव नाईक कुडाळात ठाण मांडून बसले होते.अखेर कुडाळ पंचायत समिती भगवा फडकला.सभापती व उपसभापतीच्या स्वागतासाठी सर्व शिवसैनिक शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती.

6

4