विद्यार्थ्यांनी बॅ.खर्डेकर यांच्यातील गुण अंगिकारण्याचा प्रयत्न करा : वैद्य दामले…

161
2
Google search engine
Google search engine

वेंगुर्ला,ता.२६: बॅ.बाळासाहेब खर्डेकर यांनी वेंगुर्ल्यात शिक्षणाचे बीज रोवले. त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान आपण सर्वांनी करायला हवा. बॅ.खर्डेकर यांच्यामधील गुण अंगीकारण्याचा प्रयत्न करा. प्रत्येकामध्ये काही सुप्त गुण, शक्ती, जिद्द असते ती जागृत करण्याचा प्रयत्न करा. आपल्यातील गुण व अवगुण ओळखून अवगुण काढून टाका. भूतकाळाचा फारसा विचार न करता वर्तमानाचा विचार करा. श्रमाला महत्व देऊन आरोग्य चांगले ठेवा असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे वैद्य सुविनय दामले यांनी वेंगुर्ला येथे केले.

स्व.बॅ.बाळासाहेब खर्डेकर यांचा ५६ वा स्मृतिदिन २६ डिसेंबर रोजी बॅ. खर्डेकर महाविद्यालयात प्राचार्य डॉ.विलास देऊलकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी व्यासपिठावर स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य सुरेंद्र उर्फ बाळू खांबकर, स्मृतिदिन कार्यक्रम समितीचे चेअरमन प्रा.दिलीप शितोळे, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.प्रकाश शिदे, स्टाफ सेक्रेटरी प्रा.प्रदिप होडावडेकर आदी उपस्थित होते. प्राचार्य देऊलकर यांनी बॅ.खर्डेकर यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा गौरवपूर्ण उल्लेख करीत विद्यार्थ्यांनी त्यांच्या गुणांचा अंगिकार करावा असे आवाहन केले.
दरम्यान, बॅ.खर्डेकर स्मृतिदिनानिमित्त घेतलेल्या इंग्रजी भाषेतील वक्तृत्व स्पर्धेतील प्रथम-तनिशा शिरसाट (तृतीय वर्ष विज्ञान) हिला फिरती ढाल, प्रमाणपत्र व पारितोषिक, द्वितीय-कस्तुरी शेटये, तृतीय-सेजल अणसूरकर व उत्तेजनार्थ-प्रथमेश राणे, जस्मिता नवार यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच आशिष पालकर याचा बॅ.खर्डेकर यांचे व्यक्तिचित्र रेखाटल्याबाबत तर रांगोळीतील सुवर्णपदक विजेता सुरज राणे याने बॅ.खर्डेकर यांच्या व्यक्तिचित्राची रांगोळी काढल्याबद्दल त्याला गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे माजी कर्मचारी अरविद आळवे, भाऊ राजगे, जयराम वायंगणकर, सुरेंद्र चव्हाण, पद्मा दामले, सर्व प्राध्यापक, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा.दिलीप शितोळे, इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.मनिषा मुजुमदार, प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा.डॉ.वसंतराव पाटोळे यांनी तर सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार प्रा.संपदा दिक्षित यांनी मानले.