ट्रक पलटी झाल्याने चालक ठार,एक जखमी इन्सुली घाटीतील घटना;अपघातात गाडीचे झाले दोन तुकडे

2

बांदा ता
इन्सुली घाटीत धान्य वाहतूक करणारा ट्रक पलटी झाल्यामुळे चालक ठार झाला तर क्लीनर गंभीर जखमी झाला आहे.
हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला.
पहाटे हा अपघात झाल्याची शक्यता आहे. दरम्यान जखमीला येथील बांदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे गाडी तब्बल बारा ते पंधरा फूट खोल दरीत कोसळली व दोन तुकडे झाले आहेत.प्राथमिक दर्शनी गाडी कोल्हापूर येथील असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत

4