दीलीप नार्वेकर; माझ्यावर कारवाईची धमकी देणाऱ्यांवरच होणार कारवाई…
सावंतवाडी ता.२७: “मी” पक्षाच्या चिन्हावर उभा राहिल्यामुळे काँग्रेसकडून माझी पाठराखण करण्यात आलेली आहे.त्यामुळे माझ्यावर कारवाईची धमकी देणाऱ्या कथित काँग्रेसच्या पदाधिका-यांच्या विरोधात आता पक्षाकडून कारवाई निश्चित होईल,असा विश्वास नगराध्यक्षपदाचे उमेदवार दिलीप नार्वेकर यांनी आज येथे व्यक्त केला.पक्षाचे पदाधिकारी म्हणून मिरवत असलेले काही लोक काँग्रेसला मतदान करू नका असे सांगत आहेत.त्या बाबतची रेकॉर्डिंग आमच्याकडे आहेत.ते वेळ आल्यास निश्चितच जाहीर करू,असा इशारा नार्वेकर यांनी यावेळी दिला.
राणेंच्या नावाचा वापर करणा-या केसरकर यांनी त्यांच्या नावाचा वापर करून राजकारणात यश मिळवले असे ही त्यांनी सांगितले