बबन साळगावकर; विकासाच्या मुद्द्यावर मी निवडणूक नक्कीच जिंकेन…
सावंतवाडी ता.२७: शहराच्या विकासासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत,तो विकास येथील जनतेच्या सुद्धा समोर आहे.मात्र माझ्या राजीनाम्यानंतर गेल्या तीन महिन्यात आपल्या सुंदर शहराची दुरुस्त झाली,असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.त्यामुळे भविष्यातील शहराच्या विकासासाठी मला मतदान करा,असे आवाहन मी मतदारांना करत आहे,असे माझी नगराध्यक्ष तथा नगराध्यक्षपदाचे अपक्ष उमेदवार बबन साळगावकर यांनी आज येथे सांगितले.मी माझ्या प्रचारासाठी दहा दिवस सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत.त्यात मला ८५ टक्के मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.त्यामुळे ही निवडणूक मी नक्कीच जिंकेन असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.दरम्यान केसरकरांना आणि मला कोणीही पेटवण्याचा प्रयत्न करू नये,आमची दोघांची मैत्री काल होती आणि आजही तशीच आहे असा इशारा देखिल त्यांनी विरोधकांचे नाव न घेता दिला.
श्री.साळगावकर पुढे म्हणाले,गेली पंचवीस वर्षे मी सावंतवाडीच्या विकासकामात सक्रिय आहे.मला सावंतवाडीच्या विकासाची नसाननस माहित आहे.त्यामुळे येथील नागरिकांनी मला पुन्हा निवडून द्यावे, मी याहीपेक्षा शहराचा कायापालट करेन,असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
सावंतवाडी शहरात गेली अनेक वर्षे मी सावंतवाडीकरांसाठी सुरळीत व मुबलक पाणीपुरवठा उपलब्ध करून दिला आहे.नरेंद्र डोंगर परिसरातील पाणीपुरवठा योजना ही माझ्या संकल्पनेतून साकार झाली आहे.केसरी येथील बंधाऱ्याचे नूतनीकरण हे मी माझ्या प्रयत्नातून केले आहे.त्यामुळे गेले अनेक वर्ष सावंतवाडीकरांना पाण्याचा तुटवडा जाणवला
तसेच १९७६ पासून पडीक असलेल्या जमिनीत मी कचऱ्यापासून खत प्रक्रिया प्रकल्प उभारला आहे.लोकांच्या अंगणात असलेल्या कचराकुंड्या हटविण्यासाठी मी प्रयत्न केले आहेत.शहरातल्या जोडणाऱ्या रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी मी निधी उपलब्ध करून दिला आहे.आणि निवडणुकीनंतर ते काम सुरू केले जाणार आहे.तसेच खासकीलवाडा येथील नाल्याचे पाणी पावसाळ्यात लोकांच्या घरात शिरत होते.त्यावर उपायोजना करून नाल्याची भिंत वाढवून तो प्रश्न मी कायमचा मार्गी लावला आहे.तसेच सर्व शैक्षणिक व सामाजिक कार्यक्रमांना उभारी देण्यासाठी मी नेहमीच कार्यतत्पर राहिलो आहे.अशा विविध विकास कामांच्या मुद्द्यावर मी या निवडणुकीत मतदारांना सामोरे जात आहे,असेही श्री.साळगावकर यावेळी म्हणाले.