सिंधुदुर्गनगरी ता.२७:
सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे 2019-20 चे पुरस्कार जाहिर झाले असून आदर्श पत्रकार पुरस्कार वैभववाडी येथील किशोर जैतापकर, उत्कृष्ठ पत्रकार पुरस्कार मालवणचे मनोज चव्हाण यांना, आदर्श ग्रामीण पत्रकार पुरस्कार कणकवली फोंडा येथील संजय सावंत, जेष्ठ पत्रकार सावंतवाडी येथील वसंत उर्फ अण्णा केसरकर, तर आदर्श फोटोग्राफर पुरस्कार देवगड येथील वैभव केळकर यांना हे पुरस्कार जाहिर झाले आहेत.
जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे यांनी हे पुरस्कार जाहिर केले असून यावेळी उपाध्यक्ष रमेश जोगळे, उत्तम नारकर, सचिव उमेश तोरसकर, खजिनदार संतोष सावंत, सहसचिव देवयानी वरसकर, सदस्य विद्याधर केनवडेकर, एकनाथ पवार, प्रशांत हिंदळेकर, सुधीर राणे आदि यावेळी उपस्थित होते. यासाठी जिल्हा कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली. पुरस्कार निवडीसाठी लिखानातील सातत्य, बातमिदारिचा दर्जा, पत्रकार संघाच्या कार्यक्रमातील योगदान, त्याचे समाजातील व्यक्तिमत्व या चार गुणांचा विचार करून 40 गुणांची प्रश्न पत्रिका तयार करण्यात आली होती. ती सर्व कार्यकारिणी सदस्यांना देण्यात आली. सदस्यांनी गुण दिल्यानंतर सर्वाधिक गुण मिळालेल्या पत्रकारांना हे पुरस्कार जाहिर करण्यात आले. 6 जानेवारी या पत्रकार दिनी मालवण तालुक्यातील कोळंब येथील अथर्व हॉल येथे होणाऱ्या कार्यक्रमात याचे वितरण करण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष जेठे यांनी यावेळी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे यावर्षीचे पुरस्कार जाहीर…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES