आमदार नितेश राणेंकडुन शहरातील बंद प्रकल्पाची पोलखोल…

2

प्रकल्पांना दीली भेट;मल्टीप्लेक्स आणि माॅल कधी सुरू करणार हे सांगा…

सावंतवाडी ता.२७: शहरात असलेल्या अपूर्ण प्रकल्पाची आज भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी प्रकल्पावर जाऊन पोलखोल केली.अपूर्ण प्रकल्प राहण्यास केसरकर जबाबदार आहेत,असा आरोप त्यांनी यावेळी केला.दरम्यान केसरकरांनी नुसत्या विकासाच्या गोष्टी सांगण्यापेक्षा मी जाहीर केल्या प्रमाणे मल्टीप्लेक्स आणी माॅल कधी सुरू होईल याची तारीख जाहीर करावी,असे आव्हान त्यांनी यावेळी केले.अन्य उमेदवारात शिवसेनेचे उमेदवार असलेले बाबू कुडतरकर पत्रकारांना का सामोरे गेले नाहीत ?,असा प्रश्नही यावेळी श्री.राणे यांनी व्यक्त केला.

श्री.राणे पुढे म्हणाले,येथील नाथ पै सभागृहाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.आतील खुर्च्या मेकअपरूम व बाथरूमची बिकट अवस्था झाली आहे.सावंतवाडी ही कलाकारांची भूमी म्हणून ओळखली जाते.त्यामुळे हे नाट्यगृह येथील कलाकारांचे आधारवड आहे.त्याच बरोबर बाहेरून येणारी व्यवसायिक नाटके सुद्धा या रंगभूमीवर होत असतात.मात्र या ठिकाणी आलेल्या कलाकारांची व प्रेक्षकांची नेहमीच नाराजी असते,आतील अस्वच्छतेबाबत सर्वांकडून बदनामी केली जाते,तर काही कलाकारांकडू आपण पुन्हा या ठिकाणी येणार नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त होते.हा सर्व प्रकार म्हणजे तमाम सावंतवाडीकरांचा अपमान आहे.आणि याला सर्वस्वी जबाबदार केसरकर आहेत,असा आरोप यावेळी त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले,या सभागृहा बरोबर येथील व्यापाऱ्यांना भाजी मार्केट सुद्धा सुसज्ज अवस्थेत उपलब्ध नाही याबाबत भाजी विक्रेत्यांकडून सुद्धा नाराजी व्यक्त केली जात आहे भाजी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे तर किरकोळ भाजी विक्रेत्यांना डोक्यावर छप्पर सुद्धा नाही असे असताना त्यांच्याकडून दिवसाला 30 ते 40 रुपये एवढा कर आकारला जात आहे ही बाब म्हणजे त्यांच्यावर होणारा अन्याय आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला दरम्यान त्यांनी भाजीविक्रेत्यांची चर्चा केली तेव्हा त्यांच्या मधूनही याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली यावेळी श्री राणे म्हणाले तुम्ही मला आमचा नगराध्यक्ष निवडून द्या तुमच्या हक्काच्या सुविधा आम्ही तुम्हाला मिळून देऊ असे आश्वासन त्यांनी दिले

4

4