केसरकरांना मायनिंगचा पैसा कसा चालतो..?

2

अतुल काळसेकर;श्रेय घेण्यासाठी शहरातील विकासकामे थांबवल्याचा आरोप…

सावंतवाडी ता.२७: भाजपचा पैसा रक्ताचा म्हणणाऱ्या केसरकरांना मायनिंग चा पैसा कसा काय चालतो ? असा टोला मारत.मायनिंग वाल्यांकडून पैसे घेऊनच दिपक यांनी आजपर्यंतट्या निवडणुका लढवल्या,असा आरोप भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.केसरकरांनी आजपर्यंत कोणाला श्रेय मिळू नये यासाठी सावंतवाडीतील अनेक विकास कामे थांबवली,नळपाणी योजना हे त्याचेचं एक उदाहरण आहे.त्यासाठी भाजपच्या नगरसेवकांनी आंदोलन सुद्धा केले होते.ही वस्तुस्थिती आहे,असेही श्री.काळसेकर म्हणाले.
भाजप व शिवसेनेकडून सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपाच्या नाट्यानंतर आज काळसेकर यांनी याठिकाणी पत्रकार परिषद घेतली.यावेळी अशोक सावंत,राजू राऊळ,दादू कविटकर आदी उपस्थित होते.
यावेळी श्री.काळसेकर म्हणाले,भाजपच्या पैशाला रक्ताचा वास येतो,अशी टीका करणाऱ्या केसरकरांनी आजपर्यंत इतक्या निवडणुका झाल्या,त्या सर्व निवडणुकांना मायनिग वाल्यांकडून पैसे घेतले. आणि लोकांना वाटले,त्यामुळे त्यांनी घेतलेले पैसे हे मायनिंग वाल्यांचे म्हणावे की त्यांचे या प्रश्नाचे उत्तर द्यावे,विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका होणे गरजेचे होते.परंतु आरोप-प्रत्यारोप करण्यात शिवसेनेची मंडळी पुढे आहे.मात्र येथील जनता त्यांना कदापि माफ करणार नाही.येणाऱ्या निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून येतील यात काही शंका नाही.
ते पुढे म्हणाले केसरकरांनी पालिकेत जी विकास कामे झाली.ती विकास कामे केवळ तत्कालीन नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना श्रेय मिळू नये यासाठी वारंवार थांबवण्याचा प्रयत्न केला.तत्कालीन मुख्याधिकारी जावडेकर यांनी शहरात या योजनेसाठी जाहीर करण्यात आलेले पैसे शासनाकडे जाऊ नये यासाठी केसरकरांनी दबाव आणला होता.या सर्व गोष्टी आम्हाला माहित आहे.असेही त्यांनी सांगितले.

4