ओरोस ता.२७:
जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्यावतीने 45 वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन 2 ते 4 जानेवारी दरम्यान माजी राष्ट्रपती कै डॉ. एपीजे अब्दुल कलाम नगरी न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कसाल येथे आयोजित करण्यात आले आहे.
2 जानेवारी रोजी सकाळी 9 ते 11:30 या कालावधीत विज्ञान प्रतिकृती नोंदणी व मांडणी, 11. 45 वाजता जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी उपाध्यक्ष रणजित देसाई, शिक्षण सभापती डॉ अनिशा दळवी, बांधकाम सभापती जेरोन फर्नांडिस, महिला बालकल्याण सभापती पल्लवी राऊळ, समाज कल्याण सभापती अंकुश जाधव उपस्थित राहणार आहेत. प्रमुख उपस्थिती म्हणून खास. नारायण राणे, खास. विनायक राऊत, आम. बाळाराम पाटील, आम. अनिकेत तटकरे, आम निरंजन डावखरे, आम. दीपक केसरकर, आम. वैभव नाईक आम. नितेश राणे उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी डॉ दिलीप पांढरपट्टे, मुख्य कार्यकारी अधिकारी के मंजूलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, कुडाळ सभापती नूतन आईर, पंचायत समिती सदस्य सुप्रिया वालावलकर, गोपाळ हरमलकर, कसाल सरपंच संगीता परब, कसाल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आनंद सावंत उपस्थित राहणार आहेत.
३ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता वकृत्वस्पर्धा, दुपारी 12 ते 1 निबंध स्पर्धा, दुपारी दोन वाजता प्रश्नमंजुषा स्पर्धा, 4 जानेवारी रोजी सकाळी 11:30 वाजता कार्यक्रमाचा समारोप व पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाचा सर्व विज्ञान प्रेमीनी लाभ घ्यावा असे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस व प्राथमिक एकनाथ आंबोकर यांनी केले आहे.