भाजप-राणे एकत्र आले तरी आमचा विजय निश्चित…

294
2
Google search engine
Google search engine
Google search engine

दीपक केसरकर;परबांची गाडी जळली, हा “घरचा मामला”…

सावंतवाडी ता.२७: भाजप आणि राणे एकत्र आले,तरी ते आमचा पराभव करु शकत नाहीत,ही वस्तुस्थिती आहे.सावंतवाडीकर खरे काय ते ओळखतात,त्यामुळे ते राणेंना नक्की त्यांची जागा दाखवून देतील,असा विश्वास आमदार तथा माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला.दरम्यान संजू परब यांची गाडी जाळली,हा त्यांचा घरचा मामला आहे.त्यामुळे मला कळून सुद्धा मी त्या तपासाच्या खोलात गेलो नाही.माझ्याकडे गृहराज्यमंत्री खाते होते.परंतु गृह खाते देवेंद्र फडणवीस
सांभाळत होते .त्यामुळे त्यांचा हात नेमका कोणी धरला हे त्यांना जाऊन विचारा असाही खोचक सवाल श्री.केसरकर यांनी यावेळी उपस्थित केला.

यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले,आमदार वैभव नाईक,संजय पडते,नगराध्यक्ष पदाचे महाविकास आघाडीचे उमेदवार बाबू कुडतरकर, अतुल रावराणे,विकास सावंत,अमित सामंत, उदय भोसले,पुंडलिक दळवी,अण्णा केसरकर आदी उपस्थित होते.
श्री.केसरकर पुढे म्हणाले, नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना आम्ही संधी दिली होती .त्यांची दीड वर्षे बाकी असताना त्यांनी हव्यासापोटी आपल्या पदाचा राजीनामा दिला.त्यामुळेच ही निवडणूक घेणे आम्हाला भाग पडले आता त्यांनी पुन्हा लोकांना आपल्याला निवडून देण्यासाठी आवाहन करू नये,या निवडणुकीनंतर आम्ही त्यांचे पुनर्वसन नक्कीच करू,असेही त्यांनी यावेळी सांगितले.
नितेश राणे यांनी शिवसेनेचे उमेदवार बोलत नाहीत अशी टीका आज येथे केली.त्याला प्रत्युत्तर देताना श्री.केसरकर म्हणाले,आमचे उमेदवार बोलत नाहीत.तर ते करून दाखवतात.श्री.कुडतरकर हे प्रामाणिक व संयमी आहेत.ते गांधी प्रवृत्तीचे आहेत.त्याच बरोबर ते इंजिनीयर सुद्धा आहेत .याचा वापर ते नगराध्यक्ष झाल्यानंतर याठिकाणी प्रकल्प उभारण्यासाठी नक्कीच करतील,असा विश्वास देत महाविकास आघाडीचे उमेदवार कुडतरकर यांना बहुमतांनी विजयी करा,असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.
ते पुढे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी राणे प्रवृत्ती आपल्या पक्षात घेऊ नका असे बजावले होते.मात्र तरीसुद्धा त्यांनी राणेंना आपल्या पक्षात थारा दिला.आणि स्वतःचे मुख्यमंत्रिपद गमावून बसले.मात्र हाच योग आम्हाला लाभला आणि महाविकास आघाडीची सत्ता आणण्यात आम्हाला यश आले.या सर्व गोष्टी योगायोगाने घडत गेल्या,आणि राणे ज्या पक्षात जातात तो पक्ष संपतो हे,पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
ते पुढे म्हणाले, सावंतवाडी नाथ पै सभागृहाच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाला आहे.ते काम सुद्धा निवडणुकीनंतर नक्कीच मार्गी लागेल .त्याच बरोबर शिल्पग्राम चा सुद्धा कायापालट करण्यात आम्हाला यश आले आहे.या निवडणुकीनंतर त्याही प्रकल्पासाचा शुभारंभ नवोदित नगराध्यक्ष कुडतरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करू आणि सावंतवाडीत राणेंनी कंटेनर थिएटरचे स्वप्ने दाखवू नये, माझ्या वडिलांनी याआधी या ठिकाणी सुसज्ज थिएटरची सुविधा येथील जनतेला उपलब्ध करून दिली होती.मात्र काही कारणास्तव ते बंद होते.आता येत्या चार महिन्यात ते थिएटर सुद्धा दुरुस्त करून सावंतवाडी करांना मनोरंजनाची संधी पुन्हा उपलब्ध करून देऊ.त्यामुळे राणेंनी आम्हाला तारखा घोषित करण्याचे आव्हाने देऊ नये,असेही श्री.केसरकर यावेळी म्हणाले.

\