शितल गावडे,वैष्णवी केळुसकर यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर….

2

वेंगुर्ले.ता.२७: वेंगुर्ले तालुक्यातील श्री.वेताळ विद्यामंदिर तुळस शाळेच्या उपक्रमशील मुख्याध्यापिका श्रीम.शितल प्रशांत गावडे व मठ कणकेवाडी शाळेच्या उपक्रमशील उपशिक्षिका श्रीम. वैष्णवी विकास केळूसकर यांना बालिका दिनाचे औचित्य साधून अविष्कार फाऊंडेशन कोल्हापूर या संस्थेचा ‘क्रांतिज्योजी सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे.

मुलींची पटनोदणी, मुलींची उपस्थिती, सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना इ.उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल संस्थेच्या निवड समितीने राज्यस्तरीय पुरस्कारासाठी त्यांची निवड केली आहे. दि.५ जानेवारी २०२० रोजी गणपतीपुळे – रत्नागीरी येथे पुरस्कारचे वितरण मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल श्रीम.शितल गावडे व श्रीम. वैष्णवी केळूसकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

4