तर…. मी फुकट जमीन द्यायला तयार…

281
2

नारायण राणे; सावंतवाडी ताब्यात घेण्यासाठी अधिकार वाणीचा मतदारांकडे हट्ट…

सावंतवाडी ता.२७: खंडणी मागणे लुटमार करणे हे शिवसेनेच धंदे आहेत,त्यामुळे कोणी माझ्यावर नाहक टीका करू नये,मी कोणाची एक इंच जरी जमीन लाटली असेल तर तसे पुरावे द्यावेत,मी सर्व जमीन फुकट द्यायला तयार आहे,असा इशारा आज येथे आयोजित पत्रकार परिषद माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी दिला.दरम्यान सावंतवाडीत जिंकायचा माझा बाल हट्ट नाही,तर अधिकार वाणीचा हट्ट आहे.त्यामुळे येथील जनता संजू परब यांच्या पाठीशी राहून त्यांना निवडून देईल आणि माझा हट्ट पुर्ण करतील,असा विश्वासही श्री.राणे यांनी व्यक्त केला.
सावंतवाडी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रचाराची सांगता आज झाली.यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी,नितेश राणे,राजन तेली, संजू परब संदीप कुडतरकर रेश्मा सावंत, संध्या तेरसे आदी उपस्थित होते.
यावेळी नारायण राणे म्हणाले,मला सावंतवाडी ताब्यात घ्यायची आहे.हा माझा बालहट्ट नाही,तर हक्काने आणि अधिकारवाणीने सावंतवाडी कारण कडे मी तशी मागणी केली आहे असे त्यांनी सांगितले.

4