कला-क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवा अंतर्गत सहभाग…
uसिंधुदुर्ग जिल्हा परिषद आयोजित कला-क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवांतर्गत घेण्यात आलेल्या समूहगान स्पर्धेत सावंतवाडी तालुका मळेवाड केंद्रबल गटातून,मळेवाड शाळा नंबर २ ने लहान गटात प्रथम तर मोठ्या गटात द्वितीय क्रमांक पटकाविला.विजेत्या संघांना सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती पंकज पेडणेकर व माजी उपसभापती संदीप नेमळेकर यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.ही स्पर्धा येथील नाथ पै सभागृहात संपन्न झाली.
यावेळी मळेवाड केंद्रप्रमुख वंदना परब,बांदा विस्तार अधिकारी सौ.साळगावकर,माडखोल केंद्रप्रमुख श्री.देसाई,जिल्हा परिषद शाळा मळेवाड मुख्याध्यापिका दीक्षा आडारकर,उपशिक्षिका संध्या बिबवणेकर,संगीता राळकर तसेच सावंतवाडी तालुक्यातील इतर केंद्रातील शिक्षक-विद्यार्थी उपस्थित होते.