राणेंच्या पुत्राने गोव्यात बोलावून साळगावकरांना काय कानमंत्र दिला..?

229
2

दीपक केसरकर;गांधी चौकात सभा का घेतली नाही यांचे उत्तर द्या….

सावंतवाडी ता.२८: येथील नगराध्यक्षपदाची निवडणूक सावंतवाडीकरांवर लादली,असा आरोप करणाऱ्या नारायण राणे यांच्या पुत्राने बबन साळगावकर यांना गोव्यात बोलावून कोणता कानमंत्र दिला होता,असा खोचक सवाल पालकमंत्री दीपक केसरकर यांनी यांनी आज येथे पत्रकार परिषदेत व्यक्ती केला.आमने सामनेची भाषा करणाऱ्या राणेंनी तब्बल दोन दिवस गांधी चौक येथील मैदान बुक करून ठेवले होते.मात्र लोक येणार नाहीत,गर्दी होणार नाही,त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी सभा घेणे टाळले.ही वस्तुस्थिती आहे.त्यामुळे आमने सामने ची भाषा त्यांना शोभत नाही,असेही श्री.केसरकर म्हणाले.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्री.केसरकर यांनी आज येथे पत्रकार परिषद घेतली.यावेळी ते म्हणाले,ज्या शिवसेनेच्या मुशीतून नारायण राणे मोठे झाले,त्या पक्षाला खंडणीचा पक्ष म्हणणे म्हणजे कृतघ्नपणा आहे.राणे जेवढे सावंतवाडीत येऊन बोलतील तेवढे आमची मते वाढतील राणेंनी आपल्यावर आरोप केले ते सद्यस्थितीत वैफल्यग्रस्त झाले आहेत आपल्या हातात सत्ता गेले त्यामुळे नाहक बडबडत आहे सावंतवाडीची जनता माझ्यावर प्रेम करत आहे त्यामुळे कोणी कितीही प्रयत्न केले तरी बाबू कुडतरकर यांना या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून लोक निवडून देणार आहेत असेही केसरकर म्हणाले आपल्यावर आरोप करणार्‍या अतुल काळसेकर यांचा त्यांनी समाचार घेतला आपल्या आर्थिक फायद्यासाठी तिकीट विकणाऱ्या काळसेकरांनी आम्हाला निष्ठेच्या गजाली सांगू नये जठार व काळसेकर यांनी आर्थिक गैरव्यवहार करून नारायण राणेंना भाजपमध्ये घेतले हे आम्हाला माहीत आहे त्यामुळे मला तोंड उघडायला लावू नये असेही केसरकर म्हणाले

4