मग…केसरकरांवर दारोदारी फिरण्याची वेळ का आली…?

2

राजन तेलींचा सवाल;आता भावनिक राजकारणाला जनता बळी पडणार नाही…

सावंतवाडी ता.२८: शहराच्या विकासासाठी दीपक केसरकरांनी १७८ कोटी खर्च दिले,तर मतांसाठी दारोदारी फिरण्याची त्यांच्यावर वेळ का आली?,तसेच महाविकास आघाडीची मदत का घेतली?असा सवाल भाजपाचे नेते राजन तेली यांनी आज येथे केला.दरम्यान सावंतवाडीची जनता केसरकरांच्या एककल्ली धोरणाला कंटाळली आहे.त्यामुळे आता त्यांचे भावनिक राजकारण चालणार नाही.आम्ही अतिरेक करीत आहोत,असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सत्तेत आहात,आमच्यावर करा कारवाई,असे आव्हानही त्यांनी यावेळी श्री.केसरकर यांना दिले.श्री.तेली यांनी आज या ठीकाणी पत्रकार परिषद घेतली.यावेळी नगराध्यक्षपदाचे उमेदवार संजू परब,राजू राऊळ आदी उपस्थित होते.

श्री.तेली पुढे म्हणाले,विधानसभेत केसरकर निवडून आलेत,ही भाजपाची मेहेरबानी होती.कमळ निशाणी आणि भाजपच्या नेत्यांचे फोटो यावरच ते विजयी झाले.भाजपाची कमळ निशाणी जर माझ्याकडे असती तर माझा विजय निश्चित होता,असेही त्यांनी यावेळी सांगितले.
ते पुढे म्हणाले,नुकत्याच झालेल्या बांदा निवडणुकीत केसरकर यांनी जातीवादाचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला.मात्र तो मोडीत काढत आम्ही भाजपाचा सरपंच बांधायला दिला.तेच राजकारण आता विविध समाजाच्या मेळाव्यात जाऊन त्या-त्या समाजाच्या बाजूने भाषणे करून आणि भूलथापा मारून मते खेचण्याचे काम केसरकर करीत आहेत मात्र याला आता येथील जनता बळी पडणार नाही.त्यांनी चष्माच्या कारखान्याची घोषणा केली आहे.मात्र त्यासाठी अधिकृत जागाच नाही,हे मी घातलेल्या माहितीच्या अधिकारात निष्पन्न झाले आहे.असेही ते यावेळी म्हणाले.

4