शिरोडा येथे ॲबॅकस स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

2

वेंगुर्ला :ता.२८ मुलांनी यशस्वी होण्यासाठी कठोर मेहनत करणे आवश्यक आहे. अॅबॅकसच्या विद्यार्थ्यांची मेहनत दिसून येते. त्यामुळे विद्यार्थ्यांसोबतच तेजस्वी अॅबॅकसचेही कौतुक करावे तेवढे थोडे आहेत असे प्रतिपादन मुख्याध्यापक अवधूत एनजी यांनी केले. कोल्हापूर येथे १५ नुकत्याच प्रोक्टीव्ह अॅबॅकस मार्फत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय अॅबॅकस स्पर्धेत शिरोडा, रेडी, वेंगुर्ला येथील तेजस्वी अॅबॅकस या संस्थेच्या सुमारे ७५ विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. त्यातील १४ विद्यार्थ्यांनी ट्राॅफी तर ६० विद्यार्थी हे सुवर्णपदकाचे मानकरी ठरले होते. त्यांच्या गुणगौरव कार्यक्रम ते बोलत होते.
शिरोडा हायस्कुल येथे या सर्वांचा सत्कार सोहळाआयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला अ.वि.बावडेकर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. एनजी, निवृत्त पर्यवेक्षक एस.एस.धुरी, शिरोडा ग्रामपंचायत सदस्य राहुल गावडे आणि पालक प्रतिनिधी म्हणून श्री. पाटील, तेजस्वी अॅबॅकस शिरोडाचे संचालक मनोज शारबिद्रे व शिक्षिका सानिका परब, सीमा मेस्त्री, विद्यार्थी व पालक आदी उपस्थिती होते. यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली.
स्पर्धेचा सविस्तर निकालः वेद वेंगुर्लेकर, जिया सूर्याजी आणि सर्वेश देवजी यांनी आपापल्या गटात प्रथम क्रमांक मिळवला. गुरुनाथ फोडनाईक, भाग्यश्री राणे, दिशा पांढरे व आस्था पाटील यांनी द्वितीय क्रमांक मिळवला तर सावी तांडेल, निहार आरोलकर, दर्शिल वायंगणकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला. सानिका मोरजकर, गजानन टीनेकर, सानिका नाईक, समर्थ नाईक यांना उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले. यापैकी निहार आरोलकरने सलग दुसरी ट्राॅफी घेतली तर दिशा पांढरे व सानिका मोरजकर यांनी सलग तिसरी ट्राॅफी जिंकत यशाची हॅटट्रिक साजरी केली. या सर्व मुलांसोबत अन्य दहा जणांची राष्ट्रीय अॅबॅकस स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

4