पक्षशिस्त भंगाची नोटीस; कुडतरकर यांना निवडुन देण्याच्या थोरातांच्या सुचना….
सावंतवाडी ता.२८: काँग्रेसचे बंडखोर उमेदवार दिलीप नार्वेकर यांच्यावर पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.याबाबत योग्य तो खुलासा करा,अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करू,असा इशारा कॉंग्रेस प्रदेश कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.याबाबतची माहिती जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी दिली.दरम्यान या निवडणुकीत महा विकास आघाडीचे उमेदवार बाबू कुडतरकर हेच महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत,असे सांगून त्यांनी सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांना कुडतरकर यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्या,असे आवाहन केले आहे.याबाबतचे पत्र जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांच्यासह शिवसेनेचे उमेदवार कुडतरकर यांना देण्यात आले आहे.