जिल्हास्तरिय स्पर्धेत तालुक्याचे करणार प्रतिनिधीत्व
वेंगुर्ले : ता.२८ शालेय तालुकास्तरीय बाल कला क्रिडा व ज्ञानी मी होणार महोत्सवात जिल्हा.प.पूर्ण प्राथमिक शाळा दाभोली नंबर-१ च्या विद्यार्थ्यांनी चांगले यश संपादन केले आहे. समूहगीत स्पर्धेत लहान गटात प्रथम क्रमांक पटकावला.तसेच मोठ्या गटात समूहगीत स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. असून जिल्हास्तरिय स्पर्धेसाठी या संघाची निवड झाल्याने ते वेंगुर्ला तालुक्याचे प्रतिनिधित्वही करणार आहेत.
या स्पर्धैसाठी विद्यार्थी, शिक्षक व पालक सुभाष कांदळकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभलं. या स्पर्धेत वादक कलाकार म्हणून कु. विघ्नेश गोलतकर कु. सार्थक कांदळकर यांनी उत्कृष्ट कामगिरी बजाविली. लहान गटामध्ये हेरंब गोलतकर, साहिल दाभोलकर,अनुष परब, नेहा राजापूरकर, सृष्टी गोलतकर, अंतरा दाभोलकर, मयंक दाभोलकर, साई साळगावकर, सर्वेश माडकर तर मोठ्या गटात दिशा पडवळ, भैरवी मयेकर, मधुरा मेस्त्री, सृष्टी करंगुटकर, चिन्मयी पाटील, कुणाल कासले,निखिल दाभोलकर, विष्णू आरोलकर, संजना दाभोलकर व पूर्वा माडये या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. या सर्व विद्यार्थ्यांचे गावातून व तालुक्यातून अभिनंदन होत आहे.