विकास सावंत;बाबू कुडतरकरांना महाविकास आघाडीचा पाठींबा…
सावंतवाडी ता.२८: काँग्रेसचे बंडखोर उमेदवार दिलीप नार्वेकर यांच्याकडे असलेले बाळासाहेब थोरात यांच्या पाठिंब्याचे पत्र बोगस आहे.त्यामुळे त्यांच्यावर प्रसंगी फौजदारीची कारवाई होऊ शकते,कार्यकर्त्यांचा विचार करता आपण मनुष्य आहोत,अशी भूमिका काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत मांडली.दरम्यान या सूचनेनुसार आता पक्षाकडून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बाबू कुडतरकर यांना येथील जनतेने व काँग्रेस मतदारांनी पाठिंबा द्यावा,असे आवाहन त्यांनी यावेळी केले.आज सावंत यांनी उशिरा याठिकाणी पत्रकार परिषद घेतली.आपण बाहेर असल्यामुळे पक्षाकडून आलेला मेल आपल्याला मिळण्यास उशीर झाला,तरी कार्यकर्त्यांनी कन्फ्युजन होऊ नये,यासाठी आपण पत्रकार परिषद घेऊन ही माहिती देत आहोत,असे श्री.सावंत म्हणाले,
आपण यापूर्वीच श्री.नार्वेकर यांनी दिलेले पत्र खरे नाही.थोरात मराठीतही गरज नाही शासकीय लेटरहेडवर ते पत्र देऊ शकत नाही असे जाहीर केले होते त्यामुळे आता खरी वस्तुस्थिती उघड झाली आहे असेही सावंत म्हणाले यावेळी आमदार दीपक केसरकर प्रवीण भोसले बाबल्या दुभाषी रवींद्र म्हापसेकर अशोक दळवी आदी उपस्थित होते