विकास सावंतांनी दिलेली ती पत्रेच “बनावट”…

145
2

समीर वंजारींचा आरोप;नार्वेकरांना मिळणारा पाठिंबा बघून,सावंत वैफल्यग्रस्त…

सावंतवाडी ता.२८: येथील नगराध्यक्षपदाची निवडणूक काँग्रेस पक्षचं जिंकेल याची पक्की खात्री काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांना झाली आहे.काँग्रेस पक्षाचे उमेदवार दिलीप नार्वेकर यांच्या प्रचारात कार्यकर्त्यांची एकजूट पाहून ते वैफल्यग्रस्त बनले आहेत.त्यामुळेच त्यांनी केवळ आमदार दीपक केसरकरांच्या सांगण्यावरून पुत्र प्रेमापोटी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गणेश पाटील यांच्या नावे रातोरात बनावट पत्रे बनविली.हा सर्व प्रकार म्हणजे “रात्रीचा खेळ चाले” सारखाच आहे,असा आरोप काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी सदस्य समीर वंजारी यांनी आज येथे केला.याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे.

4