Tuesday, December 10, 2024
Google search engine
HomeUncategorizedकोरगावकरांनी माघार घेतल्याची ती "अफवा"...

कोरगावकरांनी माघार घेतल्याची ती “अफवा”…

विरोधकांकडून षडयंत्र;सावंतवाडी पोलिस ठाण्यात दिला तक्रार अर्ज…

सावंतवाडी ता.२९: नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीला अवघे काही तास शिल्लक असताना काही विरोधकांकडून रडीचा डाव खेळण्यात आला आहे.यात एका चॅनलचे नाव वापरून (ब्रेकिंग मालवणी नव्हे) अपक्ष उमेदवार अन्नपूर्णा कोरगावकर यांनी माघार घेतल्याचे त्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.दरम्यान आपल्याबाबत हे षड्यंत्र आहे.विरोधकांकडून माझा विजय निश्चित असल्यामुळे हा खोटा प्रचार करण्यात आला,असा आरोप सौ.कोरगावकर यांनी केला आहे.याबाबतची तक्रार त्यांनी पोलीस ठाण्यात दिली.
आपण माघार घेतली नाही,तरी काही लोकांनी जाणीवपूर्वक आपल्या विरोधात षड्यंत्र रचल्याचा आरोप सौ.कोरगावकर यांनी केला आहे.याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे.त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणखी वाद पेटण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments