दीपक केसरकर; महाविकास आघाडीचा पहिला विजय सावंतवाडीत…
सावंतवाडी.ता,२९: येथील जनता सुज्ञ आहे,ती कुठल्याही आमिषाला बळी पडणारी नाही,याची मला खात्री आहे.त्यामुळे नगराध्यक्षपदी बाबू कुडतरकर यांचा विजय निश्चित असून महाविकास आघाडीचा पहिला विजय हा सावंतवाडीत असेल,असा विश्वास जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार दिपक केसरकर यांनी आज येथे व्यक्त केला.श्री.केसरकर यांनी पत्नी पल्लवी केसरकर यांच्यासोबत शहरातील उर्दू हायस्कूलमध्ये आपल्या मतदानाचा हक्क बजावला.यावेळी त्यांनी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले, नगराध्यक्ष कोण निवडणुकीत विरोधकांकडून पैशाचे आम्हीच मोठ्या प्रमाणात दाखवण्यात आले मात्र सावंतवाडी येथील जनता या आमच्या पलीकडे जाऊन मतदान करेल महा विकास आघाडीच्या सर्व सदस्यांचा शिवसेनेच्या उमेदवाराला असलेला पाठिंबा लक्षात घेता हा विजय असेल. मी ही लढाई जनतेच्या पाठिंबा वर वडवली असून गेली पंचवीस वर्ष प्रेमाची विकासाची सत्ता याठिकाणी नोंदवली क वर्ग नगरपालिका असतानाही ज्या पद्धतीने या शहरात विकास केला त्या विकासाचा विजय उद्या पाहायला मिळेल. माझ्या विधानसभा निवडणुकीत सावंतवाडी शहरवासीयांनी मला चार हजाराचे मताधिक्य दिले हेच मताधिक्य या निवडणुकीतही सावंतवाडीकर बाबू कुडतरकर यांना देतील.
ते पुढे म्हणाले मी यापूर्वी जाहीर केले होते की याप्रमाणे माझी पहिली लढाई ही दहशतवादाच्या विरोधात राहिले तशीच दुसरी लढाई ही पैशाच्या गैरवापर या विरोधात राहील त्यामुळे येणाऱ्या काळात याविरोधात आवाज उठवण्यात येणार आहे तोपर्यंत असे अपप्रवृत्ती या जिल्ह्यातून आता परत नाही तोपर्यंत सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी निवडणुका जिंकणे अशक्यप्राय आहे. सावंतवाडी नगर पालिकेच्या पोटनिवडणुकी राणे विरुद्ध केसरकर अशी करण्यात आली बाथरूम ज्या पद्धतीने नारायण राणे यांचा महाराष्ट्रातील राजकारणातून पराभव झाला तसच पराभव या निवडणुकीतही सावंतवाडीकर जनता केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कालपर्यंत नारायण राणे हे केसरकर यांनी कोणतेही विकास काम केले नाही अशी टीका करत होते तर त्याच नारायण राणे यांच्या पुत्राला अचानक साक्षात्कार होऊन त्यांनी माझ्या विकास कामाची स्तुती केली. एका अर्थी केसरकर यांच्यावर टीका केल्यानंतर मते मिळणार नाही हे विरोधकांना लक्षात आल्यानंतर केसरकर यांच्या नावाचा वापर करून मते मिळवण्याचा एक प्रकारे त्यांनी प्रयत्न केला असेही केसरकर म्हणाले.
यावेळी पल्लवी केसरकर यांनीही सावंत वाडेकर जनता सुज्ञ असल्याने येथील जनता संयमी शांत व सुसंस्कृत सावंतवाडीच्या विकासाच्या बाजूने कौल देतील व बाबू कुडतरकर यांना विजयी करतील असा विश्वास व्यक्त केला.