महाराष्ट्र औद्योगिक महिला सहकारी संस्थांचा महासंघ व महिला काथ्या का. औ. सहकारी संस्थेचे आयोजन
वेंगुर्ले : ता.२९ महाराष्ट्र राज्य औद्योगिक महिला सहकारी संस्थांचा महासंघ मर्या. बुलढाणा आणि महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्था मर्या. वेंगुर्ला जि सिंधुदुर्ग ह्यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ३ जानेवारी २०२० रोजी वेंगुर्ले येथे एक दिवसीय महिला संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
नवीन वर्षात महिलांना खंबीर बनविण्याच्या दिशेने एक पाऊल म्हणून हे एक दिवसीय संमेलन होत आहे. वेंगुर्ले म्हाडा येथील महिला काथ्या कामगार सहकारी संस्थेच्या सभागृहात हे संमेलन सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालणार आहे. ह्या सम्मेलनात भारतीय राष्ट्रीय सहकारी संस्थेची कार्य प्रणाली, महिलांसाठी असलेल्या शासकीय योजना, महिलांसाठी असलेले कायदे, आरोग्या विषयी असलेल्या महिलांच्या समस्या, बँक कर्ज प्रकरणे, स्त्री पुरुष समानता ह्या विषयी संबंधित तज्ञ मार्गदर्शक यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. तरी ह्या संधीचा जास्तीत जास्त महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य औद्योगिक महिला सहकारी संस्थांच्या महासंघाच्या अध्यक्षा सौ. सुरेखा खोत, महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्था व्यवस्थापकीय संचालिका सौ. प्रज्ञा परब आणि सावित्रीबाई फुले पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ.प्रविणा खानोलकर यांनी केले आहे.