नितेश राणे;संजू परब मोठ्या मताधिक्याने विजयी होतील…
सावंतवाडी.ता,२९:
आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली आहे.त्यामुळे आम्हाला निश्चितच येथील जनता सकारात्मक कौल देईल.भाजपाचे उमेदवार संजू परब हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी आज येथे व्यक्त केला.
श्री राणे यांनी आज सावंतवाडीत येवून बुथला भेटी दिल्या.यावेळी येथील सबनिसवाडा येथे त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.ते म्हणाले आमचा विजय निश्चित आहे. लोकांनी आमच्या बाजूने कौल दिला आहे. त्यामुळे उद्याचा विजय आमचाच असेल.श्री परब मोठ्या मताधिक्क्याने निवडून येतील.असे यावेळी त्यांच्या समवेत परिमल नाईक, राजू राऊळ, स्नेहा सावंत आदी उपस्थित होते.