६० टक्के मतदान;सहा उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद…
सावंतवाडी.ता,२९:
येथील पालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी झालेली निवडणूक प्रक्रिया आज शांततेत पार पडली. आता सावंतवाडीचा नवीन नगराध्यक्ष कोण याकडे सर्वांचे डोळे लागुन राहीले आहेत. आज य झालेल्या निवडणुकीत अंदाजे ६० टक्के मतदान झाल्याचा अंदाज निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी व्यक्त केला आहे.
उद्या सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून दीड ते दोन तासात नगराध्यक्ष नेमका कोण याचे चित्र स्पष्ट होणार आहे. सावंतवाडी पालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी आज झालेली निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली कापसासाठी निवडणूक प्रक्रियेसाठी तब्बल सहा उमेदवार रिंगणात राहिले होते.यात विद्यमान प्रभारी नगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर,दिलीप नार्वेकर यासह भाजपाचे संजू परब, शिवसेनेचे बाबू कुडतरकर,अमोल साटेलकर आदींचा समावेश होता.