नितेश राणे; वैभववाडी अ. रा. विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
वैभववाडी.ता,२९:
जीवनात शिक्षणाचे महत्त्व खूप आहे. इतर देशांनी शिक्षणावर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. ते देश अथवा राज्ये प्रगतशील म्हणून नावारूपाला आली आहेत. बदलती शिक्षण पध्दतीबाबत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी माहिती घेत त्या दिशेने वाटचाल केली पाहिजे असे प्रतिपादन आ. नितेश राणे यांनी व्यक्त केले.
वैभववाडी तालुका शिक्षण संस्था मुंबई संचलित अर्जुन रावराणे विद्यालय व कै हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन शनिवारी पार पडले. या स्नेहसंमेलनच्या उदघाटनप्रसंगी संस्था कार्याध्यक्ष सदानंद रावराणे, स्थानिक अध्यक्ष जयेंद्र रावराणे, नगराध्यक्षा अक्षता जैतापकर, संचालक यशवंत रावराणे, अर्जुन रावराणे, अरविंद रावराणे, दत्ताराम रावराणे बाजीराव रावराणे, विजय रावराणे, दादा रावराणे, उपनगराध्यक्ष रोहन रावराणे, भालचंद्र साठे, संतोष पवार, बाप्पी मांजरेकर, समिता कुडाळकर, रविंद्र तांबे, हर्षदा हरयाण, प्राची तावडे, दिपा गजोबार, शोभा लसणे, संपदा राणे, संताजी रावराणे, शरद नारकर, रत्नाकर कदम, प्र. सी. एस. काकडे व.पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. नितेश राणे म्हणाले, माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांनी जिल्ह्यात इंजिनिअरिंग कॉलेज, मेडीकल कॉलेज, डेअरी कॉलेज सुरू केले. याचा चांगला फायदा जिल्ह्यातील युवकांना झाला आहे. जीवनात शिक्षणाचे महत्त्व खूप आहे. इतर देशांनी शिक्षणावर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. ते देश अथवा राज्ये प्रगतशील म्हणून नावारूपाला आली आहेत. बदलती शिक्षण पध्दतीबाबत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी माहिती घेत त्या दिशेने वाटचाल केली पाहिजे असे सांगितले.
स्थानिक अधिक्षक जयेंद्र रावराणे यांच्या शैक्षणिक योगदानाचे आ. राणे यांनी कौतुक केले. ही संस्था शिस्तबद्ध व दर्जेदार शिक्षण देणारी संस्था आहे. या क्षेत्रात खूप अडचणी व आव्हाने आहेत. त्या आव्हानाला जयेंद्र रावराणे सामोरे जात आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी त्यांचीही धडपड सुरू असल्याचे सांगत त्यांनी या संस्थेच्या मागे खंबीर पणे उभा असल्याचे सांगितले. सदानंद रावराणे, जयेंद्र रावराणे यांनी मनोगत व्यक्त केले. राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री शिंदे यांचा आ. नितेश राणे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. घवघवीत यश संपादन केलेल्या व क्रीडा क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना यावेळी गौरविण्यात आले. सिनेनाट्य कलाकार संतोष तेली यांचा आ. नितेश राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेच्या वार्षिक विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. पार पडलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात बाल कलाकार व विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य, नाट्यछटा सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली. सर्व मान्यवरांचा शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री नादकर यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने प्रेक्षक, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.