मालवण तालुका पत्रकार समितीचे पुरस्कार जाहीर…

131
2

नरेंद्र परब स्मृती पुरस्कार बंटी केनवडेकर तर भाईसाहेब खांडाळेकर स्मृती पुरस्कार संतोष हिवाळेकर ; ६ जानेवारीला वितरण…

मालवण, ता. २९ : तालुका पत्रकार समितीच्यावतीने दिला जाणारा सन २०१८-१९ या वर्षाचा कै. नरेंद्र परब स्मृती पुरस्कार तरुणभारतचे पत्रकार विद्याधर ऊर्फ बंटी केनवडेकर तर ग्रामीण भागातील कै. भाईसाहेब खांडाळेकर स्मृती पुरस्कार पोईप येथील पत्रकार संतोष हिवाळेकर यांना जाहीर झाला आहे. येत्या ६ जानेवारीला होणार्‍या पत्रकार दिन सोहळ्यात या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. पुरस्कारांची घोषणा आज पत्रकार समितीच्या बैठकीत करण्यात आली.
मालवण तालुका पत्रकार समितीची बैठक शासकीय विश्रामगृह येथे समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेस उपाध्यक्ष अमित खोत, सचिव प्रशांत हिंदळेकर, खजिनदार कृष्णा ढोलम, जिल्हा कार्यकारिणी सदस्य बंटी केनवडेकर, नंदकिशोर महाजन, मनोज चव्हाण, सौगंधराज बादेकर, सिद्धेश आचरेकर, परेश सावंत, उदय बापर्डेकर, गजानन वालावलकर, नितीन आचरेकर, अनिल तोंडवळकर, सुरेश घाडीगावकर, सुधीर पडेलकर, महेंद्र पराडकर, संदीप बोडवे, मंगेश नलावडे, गणेश गावकर, शैलेश मसुरकर, झुंजार पेडणेकर, आप्पा मालंडकर, संग्राम कासले यांच्यासह तालुक्यातील समिती सदस्य उपस्थित होते.
या बैठकीत पत्रकार समितीच्यावतीने दिल्या जाणार्‍या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. ६ जानेवारीला जिल्हा पत्रकार संघ व तालुका पत्रकार समिती यांच्यावतीने कोळंब येथील स्वामी समर्थ हॉल येथे होणार्‍या पत्रकार दिन सोहळ्यात या दोन्ही पुरस्कारांचे वितरण होणार आहे. निवडीनंतर सर्व उपस्थित पत्रकार समिती सदस्यांनी पुरस्कार प्राप्त पत्रकारांचे अभिनंदन केले. यावेळी आगामी काळातील कार्यक्रमावरही चर्चा करण्यात आली.

4