कातकरी मुलांना चपलांची भेट….

2

युवासिंधुचा उपक्रम;तीसहून अधिकांना मिळाला लाभ…

वेंगुर्ले,ता.२९:उघड्या पायाने चालणाऱ्या कातकरी समाजाच्या मुलांना चपला देऊन येथील युवा सिंधू फाउंडेशन कडून अनोखा उपक्रम राबविण्यात आला.तब्बल ३० हून अधिक मुलांना हा लाभ देण्यात आला.
दरम्यान अनेक सुविधांपासून वंचित राहिलेल्या या समाजातील मुलांच्या मदतीसाठी सामाजिक काम करणाऱ्या दात्यांनी पुढे यावे. असे आवाहन फाउंडेशनच्या वतीने सागर नाणोसकर यांनी केले. नव्या वर्षाच्या निमित्ताने या मुलांना पायातील चपला यांची भेट देण्यात आली. यावेळी फाऊंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते. मुलांना चपला दिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता.

4