आंबोली-चौकुळ येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण…

2

वडिलांची पोलिसात धाव; अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल…

सावंतवाडी ता.२९: आंबोली-चौकुळ येथील एका अल्पवयीन मुलीचे अज्ञाताकडून अपहरण करण्यात आले आहे.ही घटना काल रात्री आठ वाजण्याच्या सुमारास भावई मंदिर परिसरात घडली.दरम्यान याबाबत तिच्या वडीलांनी सावंतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.त्यानुसार पोलिसांनी अज्ञाता विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.याबाबतची माहिती सावंतवाडी पोलीस ठाण्यातून देण्यात आली.
आपल्या मुलीचे कोणीतरी अपहरण केले,असे तिच्या वडिलांचे म्हणणे आहे. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

2

4