केसरकरांना होमपिचवर राणेंचा धक्का…

2

सावंतवाडी पालिका राणेंच्या ताब्यात;२३ वर्षानी राणेंचे स्वप्न पुर्ण….

सावंतवाडी/अमोल टेंबकर,ता.३०: पालकमंत्री दीपक केसरकर यांना आपल्या होमपिचवर अखेर नारायण राणे यांनी दणका दिला.या ठिकाणी श्री.केसरकर यांच्या ताब्यात असलेली सावंतवाडी नगरपालिका आता नारायण राणे यांनी संजू परबांच्या रूपाने ताब्यात घेतली आहे.अनेक वर्षे सावंतवाडी ताब्यात घेण्याचे स्वप्न अखेर नारायण यांनी पूर्ण केले आहे.त्यामुळे केसरकरांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

सावंतवाडी नगरपरिषदेवर गेली अनेक वर्षे केसरकर यांची सत्ता होती.केसरकर यांचा प्रवास राष्ट्रवादी शिवसेना,असा राहिल्यानंतर सुद्धा त्यांनी आपली सत्ता अबाधित राखली होती.मात्र मागच्या विधानसभा निवडणुकीत येथील विद्यमान नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी राजीनामा देत विधानसभा निवडणूक लढविली.आणि त्या ठिकाणी ही निवडणूक प्रक्रिया लागली होती.या ठिकाणी शिवसेनेकडून बाबू कुडतरकर यांना संधी देण्यात आली होती.तर भाजपकडून संजू परब यांना संधी देण्यात आली होती.
श्री परब हे नवखे उमेदवार असल्यामुळे व राणेसमर्थक असल्यामुळे त्यांना लोक स्वीकारतील की नाही,याबाबत शंका होती.मात्र सर्व अंदाज फोल ठरवत अखेर या ठिकाणी संजू परब यांनी बाजी मारली आहे.नारायण राणे,नितेश राणे यांनी विकासाच्या मुद्द्यावर लोकांना केलेले अपील सावंतवाडीकरांनी स्वीकारले आहे.तर केसरकारांचा दहशतवादाचा मुद्दा या ठिकाणी चाललेला दिसत नाही.त्यामुळे गेली अनेक वर्षे असलेले नारायण राणे यांचे स्वप्न पूर्ण झालेले आहे.या सर्व प्रक्रिये नंतर आज झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांचे यादीत नाव नाही तर दुसरीकडे त्यांच्या ताब्यात असलेली सावंतवाडी पालिका आता भाजपाकडे गेली आहे त्यामुळे हे दोन्ही धक्के केसरकरांना आता राजकीय भवितव्यात मोठा फटका देण्याची शक्यता आहे

4