ठाकरे सरकार हे जनतेचे सरकार….

404
2
Google search engine
Google search engine

अरुण दुधवडकर; कोकिसरेत खडीकरण, डांबरीकरण कामांचे भूमिपूजन

वैभववाडी.ता,३१: ठाकरे सरकारच्या माध्यमातून लोकोपयोगी विकासकामांसाठी योग्य तो न्याय दिला जाईल. तसेच तालुक्यातील प्रलंबीत कामे लवकरच मार्गी लावू अशी ग्वाही देत ठाकरे सरकार हे जनतेचे सरकार असल्याचा विश्वास शिवसेना संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनी व्यक्त केला.
कोकिसरे खांबलवाडी, बांधवाडी व बांबरवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण कामाच्या भूमिपूजनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शिवसेना नेते संदेश पारकर, उपजिल्हा प्रमुख नंदू शिंदे, तालुका प्रमुख मंगेश लोके, जिल्हा बँक संचालक दिगंबर पाटील, माजी सभापती लक्ष्मण रावराणे, जि. प. सदस्या पल्लवी झिमाळ, गिरीधर रावराणे, अशोक रावराणे, रमेश तावडे, संभाजी रावराणे, अण्णा मुरकर, दिलीप नारकर, कोकिसरे सरपंच सुप्रिया नारकर, विठोजी पाटील, श्रीराम शिंगरे, परेश सावंत, शहर प्रमुख प्रदीप रावराणे, स्वप्नील धुरी, अतुल सरवटे, वैभव रावराणे, दिपक पाचकुडे, विनायक जठार, सुनिल रावराणे, कमलाकर सरवणकर, मधू गुरव, अनंत नांदोसकर, श्रीकांत डाफळे, समाधान जठार, बाबा सुतार, सचिन म्हापूसकर आदी उपस्थित होते.