रुग्णालयाच्या अधीक्षकांना मारहाण केल्याप्रकरणी लिपिक निर्दोष…

296
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडीतील घटना;पगार पत्रकावर सही केल्याच्या कारणावरून घडलेला प्रकार…

सावंतवाडी ता.३१: रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक उत्तम पाटील यांना मारहाण केल्याप्रकरणी कुटीर रुग्णालयातील कर्मचारी आनंद गायकवाड राहणार खासकिलडा यांची येथील न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.याकामी ऍड.सुहेब डिंगणकर यांनी काम पाहिले.
हा प्रकार ११ जुलै २०१६ रोजी घडला होता.गायकवाड सावंतवाडी रुग्णालयात लिपिक म्हणून कार्यरत होते.यावेळी दोडामार्ग येथे प्रतिनियुक्ती असलेले डॉ.भगवान पितळे यांचा पगार का काढला ? या बाबतची विचारणा श्री.पाटील यांनी केली.या कारणावरून दोघांत शाब्दिक बाचाबाची झाली.यावेळी गायकवाड यांनी श्री.पाटील यांना बेदम मारहाण केली.यात पाटील जखमी झाले होते.याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गायकवाड यांच्या विरोधात तक्रार दिली.त्यानुसार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.याकामी नऊ साक्षीदार तपासण्यात आले.मात्र जवळच विसंगती आढळून आल्यामुळे गायकवाड यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.