शहरवासियांसोबत ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांकडून संजू परबांना शुभेच्छा…

322
2

सावंतवाडी.ता,३१: नवनिर्वाचित नगराध्यक्ष संजू परब यांना शुभेच्छा देण्यासाठी शहरवासियांसोबत ग्रामीण भागातील कार्यकर्ते व चाहत्यांनी मोठी गर्दी केली.विशेष म्हणजे नगराध्यक्ष झालेल्या परबांनी आता पुढच्या राजकीय प्रवासाची तयारी करावी अशा शुभेच्छा देण्यात आल्या.

सावंतवाडी पालखीच्या निवडणुकीनंतर विजयी झालेल्या परबांना शुभेच्छा देण्यासाठी नगरपालिकेत मोठी गर्दी झाली.यात ग्रामीण भागातील लोकांचा मोठा समावेश होता. त्याचबरोबर सावंतवाडी व्यापारी संघटना रिक्षा चालक-मालक संघटना विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी श्री.परब यांना शुभेच्छा दिल्या.

4