Monday, April 21, 2025
Google search engine
HomeUncategorizedदोडामार्ग येथे उदया तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन...

दोडामार्ग येथे उदया तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन…

राजेंद्र म्हापसेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य;१८ संघ होणार सहभागी…

दोडामार्ग.ता,३१:
जिल्हा परिषदचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र म्हापसेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दोडामार्ग येथे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा एक व दोन जानेवारीला झरे-१ (सरगवे पुर्नवसन) येथील श्री देव खंडोबा मैदानावर खेळवली जाणार आहे.
या स्पर्धेत तालुक्यातील एकूण १८ संघ सहभागी होणार असून साखळी पद्धतीने सर्व सामने खेळविले जातील. या स्पर्धेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम १ जानेवारी २०२० रोजी संध्याकाळी ७:०० वाजता होणार आहे.यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री राजेंद्र म्हापसेकर यांची प्रमुख उपस्थिती होणार आहे.
या स्पर्धेतील सर्व सामने हे ०१ जानेवारी २०२० व ०२ जानेवारी २०२० रोजी प्रकाश झोतात खेळविले जाणार आहेत.या कार्यक्रमाला व स्पर्धेला तसेच राजेंद्रजी म्हापसेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन हौशी कबड्डी असोसिएशन दोडामार्ग यांच्यावतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments