देवस्थान समितीचा निर्णय; सुरक्षेच्या कारणामुळे घेतली भूमिका…
पंढरपूर ता.३१: येथील श्री देव विठ्ठल मंदिरात उद्यापासून मोबाईल वापरावर बंदी घालण्यात येणार आहे.याबाबत देवस्थान समितीकडून निर्णय घेण्यात आला.त्यासाठी लॉकरची सुविधा करण्यात आली असून प्रत्येकी दोन रुपये घेऊन ही सुविधा देण्यात येणार आहे.
मंदिरात मोबाईल वापरावर निर्बंध आणू नये,अशी मागणी यापूर्वी भक्त व वारकऱ्यांकडून करण्यात आली होती.मात्र या मागणीकडे देवस्थान समितीकडून दुर्लक्ष करण्यात आले असून सुरक्षेच्या कारणास्तव मंदिरात मोबाईल नेण्यास बंदी घालण्यात आल्याचे यावेळी समितीकडून सांगण्यात आले.उद्या नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून हा निर्णय अमलात आणण्यात येणार आहे.