वाफोलीत छत्तीसगड येथील पर्यटकांच्या कारला अपघात…

337
2

आठ फुट दरीत कोसळली;सुदैवाने कोणीही जखमी नाही…

बांदा.ता,३१:
बांदा-दाणोली मार्गावर वाफोली धरणानजीकच्या धोकादायक वळणावर मोटार दरीत कोसळून अपघात झाला. छत्तीसगड राज्यातील पर्यटक गोव्यात जात असताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले व कार सुमारे ८ फूट खोल दरीत कोसळली. कारमध्ये ५ प्रवासी होते. मात्र, कारमधील एअरबॅग्ज ऐनवेळी उघडल्याने कोणालाही गंभीर इजा झाली नाही. येथील सामाजिक कार्यकर्ते विनेश गवस व ग्रामस्थांनी पर्यटकांना सहकार्य केले. हा अपघात आज सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास झाला.
वाफोली धरणानजीकच्या धोकादायक वळणावर दोन्ही बाजूंनी झुडपे वाढली आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूंनी येणार्‍या वाहनचालकांना समोरून येणारी वाहने दृष्टीस पडत नाहीत. त्यामुळे या वळणावर सातत्याने अपघात होत असतात. सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार कळवूनही झुडपे सफाई करण्याची कार्यवाही केलेली नाही. यासाठी लवकरच लाक्षणिक उपोषण छेडण्याचा इशारा विनेश गवस यांनी दिला आहे. अपघातातील पर्यटकांना किरकोळ दुखापत झाली.

4