दोडामार्ग मधील बेपत्ता दळवी मळगावात मिळाले…

529
2
Google search engine
Google search engine
Google search engine

पोलिस कर्मचा-याच्या जागरूकीमुळे प्रकार उघड;कुंटूबाच्या दिले ताब्यात

सावंतवाडी ता.३१: येथील बस स्थानक परिसरातून नापत्ता झालेले दोडामार्ग येथील वृद्ध श्रीधर दळवी(६५) रा.भेडशी हे आज सायंकाळी मळगाव घाटीत आढळून आले.श्री.दळवी आपल्या पत्नीसमवेत आज दुपारी कामानिमित्त येथील बस स्थानक परिसरात आले होते.तेथून ते अचानक नापत्ता झाले.दरम्यान याबाबतची माहिती त्यांची पत्नी रजनी दळवी यांनी सावंतवाडी पोलिसांना दिली.त्यानुसार पोलिसांकडून शोध कार्य सुरू करण्यात आले होते.दरम्यान आपल्या बीटवर जाणारे पोलिस कर्मचारी शरद लोहकरे यांना ते मळगाव घाटीत आढळून आले.त्यानंतर श्री.लोहकरे यांनी त्यांना सावंतवाडी पोलिस ठाण्यात आणून कुटुंबीयांच्या स्वाधीन केले

सावंतवाडी शहरात गेले अनेक दिवस हरवलेल्या बालकांचा शोध घेणारी मुस्कान टीम कार्यरत आहे.या टीमच्या माध्यमातून हे शोध कार्य पोलिसांनी सुरू केले होते.पोलीस उपनिरीक्षक अमित गोते,दत्तात्रय देसाई,नवनाथ शिंदे आदि पोलीस कर्मचार्‍यांचे पथक त्यांचा शोध घेत होते. त्या दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार हवालदार लोहकरे यांना आपल्या बिट वर जात असताना ते गृहस्थ मळगाव घाटीत आढळून आले.दरम्यान याबाबतची माहिती त्यांनी ठाणे अमालदर माया पाडगावकर यांना दिली.त्यांनतर पोलीस निरीक्षक श्री धनावडे यांचे मार्गदरशनाखाली त्यांना त्यांची पत्नी व पुतण्या यांचे ताब्यात देण्यात आले.

\