वैभववाडी.ता,३१: कोल्हापूर शेतकरी सहकारी संघाचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब पी.ए राणे तथा पांडुरंग अनंतराव रावराणे यांची पुण्यतिथी २ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता वैभववाडी येथील शेतकरी सहकारी संघाच्या कार्यालयात साजरी करण्यात येणार आहे.रावसाहेब पीए राणे हे मूळ नावळे गावचे रहिवासी असून ब्रिटिश काळात मामलेदार या पदावर कार्यरत होते. त्यांचे सामाजिक कार्य मोठे असून कोल्हापुरातील शेतकरी संघ गारगोटी येथील मौनी विद्यापीठ त्याचप्रमाणे इतर सामाजिक कार्यात त्याकाळात मोठा सहभाग घेतला होता. शेतकरी संघाला नावारूपास आणण्यात त्यांचे मोलाचे कार्य होते .त्यांचं कार्य नवीन पिढीला माहीत व्हावा व त्यास त्यातून प्रेरणा मिळाली हाच जयंती साजरा करण्यामागील उद्देश आहे. या कार्यक्रमाला तालुक्यातील राजकीय पदाधिकारी सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे. असे आवाहन वैभववाडी आत्मा समितीचे अध्यक्ष महेश रावराणे यांनी केले आहे.
वैभववाडीत २ जानेवारी रोजी कोल्हापूर शेतकरी सहकारी संघाचे संस्थापक रावसाहेब पी. ए. राणे यांची पुण्यतिथी
2
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
4