गाडी चोरीचा प्रयत्न करणारा हींगोली येथील युवक ताब्यात….

145
2

सावंतवाडी बस स्थानकावरील घटना;नागरीकांच्या जागरूकीमुळे प्रयत्न फसला

सावंतवाडी ता.३१: येथील बसस्थानक परिसरात दुचाकी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला जागरूक नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.संशयित चोरटा हा हिंगोली येथील आहे.तो कुडाळ येथिल ओंकार शारबिद्रे यांची गाडी चोरी करण्याचा प्रयत्न करीत होता.दरम्यान त्याला पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे.
येथील बस स्थानक परिसरात असलेल्या गाड्या चोरीच्या उद्देशाने तपासत होता.हा प्रकार लक्षात आल्यानंतर तेथे जमलेल्या नागरिकांनी त्याला जाब विचारला व पोलिसांच्या स्वाधीन केले.दरम्यान त्याची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

4