चांदा ते बांदा विकास योजनेची संकल्पना सर्वांसाठी लाभदायक…

2

अनुश्री कांबळी : वेंगुर्ले येथे शेळी पालकांचे प्रशिक्षण शिबिर सुरू…

वेंगुर्ले: ता.३१:शासनाच्या चांदा ते बांदा विकास योजनेची संकल्पना सर्वांसाठी लाभदायक आहे. त्या योजने अंतर्गत करता येणारे वैयक्तिक तसेच गट स्तरावरील व्यवसाय सुरु करताना व व्यवसाय चालवताना आवश्यक असलेले नियोजन, प्रशिक्षण यांचे महत्व आदि विविध बाबींवर सभापती सौ. अनुश्री कांबळी यांनी मार्गदर्शन केले.
चांदा ते बांदा विकास योजने अंतर्गत शेळी पालकांचे प्रशिक्षण शिबिर वेंगुर्ला येथे सुरू झाले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन वेंगुर्ले पंचायत समितीच्या सभापती सौ. अनुश्री कांबळी यांच्या हस्ते करण्यात आले. वेंगुर्ले रामघाट येथिल सातेरी मंगल कार्यालयात सुरु असलेल्या या प्रशिक्षण शिबिराच्या उदघाटन प्रसंगी मुख्य प्रशिक्षक तथा बायफ पुणे चे डाँ. देव, सहाय्यक आयुक्त राज्यस्तरीय तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय वेंगुर्ल्याच्या डाँ. मृणाल वरठी, पशुधन विकास अधिकारी डाँ. विद्यानंद देसाई, डाँ. संदिप संसारे, पशुसंवर्धन विभागाचे श्री. साळगावकर,श्री.भांडारकर, श्री.गावडे, श्री.माळगावकर, श्री.मांजरेकर आदींसह शेळीपालक उपस्थित होते. तीन दिवस चालणार्‍या या शेळीपालन व्यवस्थापन प्रशिक्षणात बायफ विकास अनुसंधान प्रतिष्ठान पुणेचे डाँ. अविनाश देव हे प्रशिक्षण देत आहेत. तर प्रशिक्षणानंतर प्रशिक्षण घेणाऱ्या शेळीपालकांना तळवडे येथिल फार्मवर प्रत्यक्ष भेट व प्रात्यक्षिके दाखविण्यात येणार आहेत. तसेच या प्रशिक्षणात शेळीपालन व्यवसायातील संधी आणि आव्हाने यावर संपुर्ण मार्गदर्शन केले जाणार आहे. या प्रशिक्षण शिबिरात ४७ लाभार्थी सहभागी झाले असून ६ गावातील पशूसखीही सहभागी आहेत.

4