दोन महिन्यापूर्वी चोरीला गेलेले मोबाईल पोलिसांनी मुंबई येथून हस्तगत केले

2

स्थानिक गुन्हे अन्वेषण व वैभववाडी पौलिसांची कारवाई

वैभववाडी.ता,३१: वैभववाडी माईणकरवाडी येथून दोन महिण्यापूर्वी चोरीला गेलेले दोन मोबाईल पोलिसांनी आयएमईआयच्या आधारे मुंबई येथून हस्तगत केले.ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेशन व वैभववाडी पोलिसांनी केली.
वैभववाडी शहरातील माईणकरवाडी येथे अवदूत माईणकर यांच्या घरात महाविदयालयीन विदयार्थींनी भाग्याने राहात होत्या.१० आक्टोबर रोजी रविवार असल्यामुळे दुपारचे जेवन करुन त्या घरात आराम करीत होत्या.याचवेळी अज्ञात चोरटा मागच्या दरवाजाने घरात घुसला.त्यांने चार्जिंगला लावलेले दोन मोबाईल घेतले आणि तिसरा मोबाईल घेण्यासाठी जात होता.तेवढ्यात यातील एका विदयार्थींनी जाग आली.तीने आरडाओरडा केल्याबरोबर चोरट्याने दोन मोबाईल घेऊन पोबारा केला.तो जवळच असलेली शुकनदीचे पाञातून पलिकडे गेला.स्थानिक ग्रामस्थ व पोलिसांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला.माञ तो सापडला नाही.याबाबत त्या विदयार्थ्यांनी वैभववाडी पोलिसात चोरीची तक्रार दिली होती.
त्यांच्या तक्रारीनुसार पोलिस अधिक्षक सिंधुदुर्ग, पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वशन, वैभववाडी पोलिस ठाणेचे सहाय्यक पो.नि.दत्ताञय बाकारे यांच्या तपासिक अमलदार राजू जामसंडेकर, पो.ना.योगेश तांडेल, स्थानिक गुन्हे अन्वेशनचे हे.काॕ.गुरु कोयंडे, पो.काॕ.गावडे यांनी मुंबई येथे जाऊन आयएमईआय नंबरच्या आधारे लोकेशन शोधत नालासोपारा व मिरारोड येथून हे दोन्हीही मोबाईल हस्तगत केले.ज्यांच्याकडे हे मोबाईल सापडले त्यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता सदर दोन्हीही मोबाईल आरोपी योगेश शिवराम पवार रा.राजापूर याच्याकडून विकत घेतल्याचे सांगितले.आरोपी पवार यांनी आपले वडील आजारी असल्यामुळे आपल्याला पैशाची तातडीची गरज असल्याचे कारण सांगत हे मोबाईल विकल्याचे स्पष्ट झाले आहे.पोलिस सदर आरोपीच्या शोधात आहेत.आरोपीला पोलिसांच्या कारवाईचा सुगावा लागल्यामुळे तो पोलिसांना चकवा देत आहे.सदर आरोपी हा सराईत चोरटा असून लवकरच तो पोलिसांच्या ताब्यात असेल असा विश्वास तपासीक अमलदार हे.काॕ.राजू जामसंडेकर यांनी सांगितले आहे.

5

4