संजू परब;पालिका प्रशासन व कर्मचाऱ्यांकडून नवनिर्वाचित नगराध्यक्षांचे स्वागत…
सावंतवाडी ता.३१: मी नवखा असलो तरी,प्रशासकीय अधिकारी व पालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने नगरपरिषदेचा कारभार गतिमान करण्यासाठी प्रयत्न करेन,असा विश्वास सावंतवाडीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष संजू परब यांनी आज येथे व्यक्त केला.येथील पालिका कर्मचारी संघटनेच्या वतीने श्री. परब यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी ते बोलत होते.
यावेळी आसावरी केळबाईकर,तानाजी पालव साहेब,देविदास आडारकर,नगरसेवक राजू बेग,सुधीर आडिवरेकर,आनंद नेवगी,उदय नाईक,नगरसेविका दीपाली भालेकर,सौ.सासोलकर तसेच नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी सफाई कर्मचारी यांच्या वतीने सदानंद कदम व मोहन कांबळे यानीही श्री.परब यांचे पुस्पगुच्छ देऊन स्वागत केले.श्री. आडारकर यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले.तर संघटना सचिव टि पी जाधव यांनी आभार मानले.