वेंगुर्ला न. प. तर्फे १२ जानेवारी पासून ‘स्वच्छता क्रिडा व सांस्कृतिक महोत्सव २०२०‘चे आयोजन…

186
2
Google search engine
Google search engine

राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धा खास आकर्षण

वेंगुर्ले.ता.१
वेंगुर्ला शहराला फार मोठी ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. आपली संस्कृती व परंपरा यांचे जतन व्हावे तसेच स्वच्छतेचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने दि. १२ ते २१ जानेवारी २०२० या कालावधीत शहरात ‘स्वच्छता क्रिडा व सांस्कृतिक महोत्सव २०२०‘चे आयोजन केले आहे. या महोत्सवात २१ किलोमिटर लांब अशी भव्य दिव्य “राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धा” हे खास आकर्षण असल्याची माहिती नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे आयोजित केलेल्या ‘स्वच्छता क्रिडा व सांस्कृतिक महोत्सव २०२०‘ या महोत्सवाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी बोलताना नगराध्यक्ष गिरप म्हणाले की,
वेंगुर्ला नगरपरिषदेने स्वच्छता विषयक उपक्रमामध्ये विविध राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त केलेले आहेत. शहरातील नागरीकांमध्ये स्वच्छते विषयक जनजागृती निर्माण व्हावी यासाठी नगरपरिषद विविध उपक्रम राबवित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधत ‘फिट इंडिया‘ चळवळीचा शुभारंभ केला आहे. यावेळी त्यांनी फिट इंडिया चळवळ ही जनआंदोलन बनले पाहिजे असे आवाहन देशातील जनतेला केले आहे. आपण आपल्या फिटनेसबाबत उदासिन होत चाललो असल्याची खंतही पंतप्रधानांनी व्यक्त केली. फिटनेस ही आता काळाची गरज बनली असून फिटइंडिया चळवळीच्या माध्यमातून आपण निरोगी भारताच्या दिशेने आता पाऊल उचलण्याच्यादृष्टीने वेंगुर्ला नगरपरिषदेने विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले असल्याची माहितीही नगराध्यक्ष गिरप यांनी दिली.
‘स्वच्छता क्रिडा व सांस्कृतिक महोत्सव २०२०‘ या महोत्सवात खालीलप्रमाणे क्रिडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. १२ जानेवारी रोजी सकाळी १० वा. वेंगुर्ला नगरपरिषद जलतरण तलाव येथे १०, १४, १७ वर्षाखालील पुरुष, महिला व खुला तसेच ५० वर्षांवरील ज्येष्ठ नागरीक यांच्यासाठी ‘नगराध्यक्ष चषक जलतरण स्पर्धा‘ होणार आहे. १०, १४ व १७ वर्षाखालील गटातील पहिल्या तीन क्रमांकासाठी ५००, ३००, २०० तर खुल्या आणि ५० वर्षावरील गटातील पहिल्या तीन क्रमांकासाठी ७००, ५००, ३०० अशी बक्षिस देण्यात येणार आहेत. दि. १६ रोजी दुपारी ३ वाजता कॅम्प स्टेडियम येथे ‘नगराध्यक्ष चषक व्हॉलीबॉल स्पर्धा‘ आयोजित केली असून यातील प्रथम चार विजेत्यांना अनुक्रमे १० हजार, ५ हजार, २.५०० व २.५०० अशी बक्षिसे देण्यात येतील. दि. १७ रोजी दुपारी ३ वाजता कॅम्प स्टेडियम येथे ‘नगराध्यक्ष चषक कबड्डी स्पर्धा (जिल्हा कुमार गट चाचणी स्पर्धा) होणार असून पुरुष गटातील प्रथम चार विजेत्यांना १० हजार, ५ हजार, २.५००, २.५०० तर महिला गटातील प्रथम चार विजेत्यांना ४ हजार, २ हजार, १ हजार व १ हजार अशी बक्षिस देण्यात येतील.
दि.१८ व १९ रोजी साई मंगल कार्यालयात ‘नगराध्यक्ष चषक कॅरम स्पर्धा‘ होणार असून यातील प्रथम तीन विजेत्यांना ५ हजार, ३ हजार, १ हजार व १ हजार अशी बक्षिस ठेवण्यात आली आहेत.
दि. १९ रोजी राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धा (महाराष्ट्र व गोवा) होणार आहे. यासाठी २१ किमीची हाफ मॅरेथॉन, १० किमीची पॉवर रन व ५ किमीची फन रन अशा गटामध्ये ही स्पर्धा आयोजित केली आहे. सर्व गटातील प्रथम तीन विजेत्यांना आकर्षक रोख बक्षिसे रोख दिली जातील. दरम्यान दि. १९ रोजी दुपारी ३ वाजता कॅम्प स्टेडियम येथे ‘नगराध्यक्ष चषक लगोरी स्पर्धा‘ आयोजित केली आहे. यातील प्रथम तीन विजेत्यांना ५ हजार, ३ हजार, १ हजार व १ हजार अशी बक्षिस ठेवण्यात आली आहेत.
या सर्व स्पर्धांच्या अधिक माहितीसाठी संगीता कुबल (९४२२०७०६३२), पंकज केळुसकर (८४१२८०८६४६) यांच्याशी संफ साधावा. त्या पुढील दोन दिवस स्टेडियमवर सांस्कृतिक महोत्सव संपन्न होणार आहे.