वागातोर उज्वल आर्ट गॅलरीत आज मल्हार यांची चित्र प्रात्यक्षिके..

2

सावंतवाडी ता.०१: तालुक्यातील तळवडे येथील युवा प्रसिद्ध चित्रकार सत्यम विवेक मल्हार हे वागातोर येथील उज्वल आर्ट गॅलरीत आज दिनांक १ जानेवारी रोजी चित्रांची प्रात्यक्षिके दाखवणार आहेत.
श्री.मल्हार यांनी मुंबईच्या सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट मधून फाईन आर्ट मधील पदवी घेतली आहे.त्यापूर्वी मॉडेल आर्ट इन्स्टिट्यूशन मधून त्यांनी पायाभूत अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.तर पोर्टेचरमध्ये ते पदच्युत पदवी अभ्यासक्रम पूर्ण करत आहेत.
२०१५ मध्ये त्यांनी अखिल भारतीय निसर्गचित्र स्पर्धेत प्रथम पुरस्कार पटकाविला होता.२०१४ मध्ये नाशिक येथे अखिल भारतीय निसर्गचित्र स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार पटकाविला होता.जे.जे.स्कूलच्या १५९ व्या वार्षिक प्रदर्शनात त्यांनी कॅमलिन पुरस्कार पटकाविला आहे.तसेच हेमंत ठाकरे पुरस्कार व कैलासवासी पळशीकर पुरस्काराचे सुद्धा ते मानकरी आहेत.

4