विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचा उद्या सिंधुदुर्ग दौरा…

141
2
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गनगरी.ता,०१: विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर हे गुरुवार दिनांक ०२ जानेवारी २०२० रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
गुरुवार दिनांक ०२ जानेवारी २०२० रोजी सकाळी ८.३० वा. सावंतवाडी रेल्वे स्थानक येथे आगमन व शासकीय विश्रामगृह सावंतवाडी येथे राखीव, सकाळी १०.०० वा. सावंतवाडी नगरपंचायत कार्यलयास सदिच्छा भेट, दुपारी १२.०० वा. माणगांव, ता. कुडाळ येथे आगमन व अवकाळी पावसामुळे भात शेती, अंबा, काजू, नारळ, सुपारी, मत्स्यशेती यांच्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांसोबत चर्चा, दुपारी २.०० वा. शासकीय विश्रामगृह ओरोस येथे आगमन व राखीव, दुपारी ३.०० वा. शासकीय विश्रामगृह ओरोस येथे जिल्हाधिकारी, यांच्या समवेत अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत चर्चा, सायंकाळी ५.०० वा. शासकीय विश्रामगृह कणकवली येथे पत्रकार परिषद, सायं. ६.०० वा. कणकवली येथे आयोजित कणकवली पर्यटन महोत्सव २०२० या कार्यक्रमास उपस्थिती, रात्री ८ ०० वा. दैनिक प्रहार वृत्तपत्र कार्यालय, कणकवली येथे सदिच्छा भेट, रात्री ९.०० वा. कणकवली रेल्वे स्थानक येथे आगमन व रेल्वेने माणगांव, जि. रायगडकडे प्रयाण.