Thursday, November 7, 2024
Google search engine
HomeUncategorizedवेंगुर्लेत जागृती मंडळाच्या फेस्टीव्हलमध्ये ४ जानेवारीला मॅरेथान स्पर्धा

वेंगुर्लेत जागृती मंडळाच्या फेस्टीव्हलमध्ये ४ जानेवारीला मॅरेथान स्पर्धा

वेंगुर्ले.ता,०१:  वेंगुर्ले-भटवाडी येथील जागृती क्रीडा व सांस्कृतिक मंडळातर्फे ४ व ५ जानेवारी रोजी मंडळाच्या ३१ व्या वर्षी जागृती फेस्टिव्हल अंतर्गत विविध स्पर्धाचे आयोजन श्री सिद्धिविनायक मंगल कार्यालय भटवाडी येथे सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत करण्यात आले आहे.

यानिमित्त शनिवार ४ जानेवारी रोजी तालुकास्तरीय वेशभूषा स्पर्धा घेण्यात येणार आहे. हि वेशभूषा स्पर्धा संजय पुनाळेकर यांनी पुस्कृत केली असून सायंकाळी ६ वाजता बालवाडी गटासाठी, ७ वाजता पहिली ते दुसरीच्या विद्यार्थी गटासाठी, ७.३० वाजता तिसरी-चौथी तर रात्री ८ वाजता पाचवी ते नववी गटासाठी होणार आहे. शनिवार दि. ४ जानेवारी रोजी जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा वेंगुर्ले कॅम्प येथून सकाळी ७ वाजता सुरू होणार आहे. हि स्पर्धा सुनिल रेडकर व विनोद कुडाळकर यांनी पुरस्कृत केली आहे. या स्पर्धेसाठी बालवाडी, पाfहली ते दुसरी, तिसरी ते चौथी, पाचवी ते दहावी या गटातील मुलगे व मुली यांना सहभागी करून घेतले जाणार आहे. तसेच याच दिवशी सकाळी १० वाजता जिल्हास्तरीय बालकुमार चित्रकला स्पर्धा श्री सिध्दीविनायक मंगल कार्यालय भटवाडी येथे पाच गटात होणार आहे. या पाच गटात बालवाडी गटासाठी `फुल’ हा विषय, पाfहली ते दुसरीसाठी `पक्षी’, तिसरी चौथीसाठी `निसर्ग’, पाचवी ते सातवीसाठी `स्वच्छता मोहिम’, नववी ते दहावीसाठी `राष्ट्रीय एकात्मता’ हा विषय ठेवण्यात आला आहे. हि स्पर्धा माजी उपनगराध्यक्ष अभि वेंगुर्लेकर यांनी पुरस्कृत केली आहे. रविवारी सायंकाळी ६ वाजता तालुकास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा होणार आहे. हि स्पर्धा प्रसन्ना उर्फ बाळू देसाई व वसंत केशव देसाई यांनी पुरस्कृत केली आहे. या स्पर्धेत बालवाडी, पाfहली ते चौथी, व पाचवी ते दहावी असे तीन गट आहेत. हि स्पर्धा सायंकाळी ६ वाजता सुरू होणार आहे. या स्पर्धेसाठी शाळेतील विद्यार्थांनी २ जानेवारीपर्यंत श्री सिद्धिविनायक मंगल कार्यालय भटवाडी, वेंगुर्ले येथे नाव नोंदणी करावयाचे आहे.
या स्पर्धेतील प्रत्येक गटानुसार प्रथम क्रमांक पाच विजेत्यांना रोख रकमेची बक्षिसे व संजय मालवणकर स्मरणार्थ सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येतील. या जागृती फेस्टिव्हलच्या विविध स्पर्धात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल मालवणकर (९३०७४३८४५०) येथे नाव नोंदणीसाठी संपर्क साधावा असे आवाहन जागृती क्रीडा व सांस्कृतिक मंडळ भटवाडी वेंगुर्लेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख विवेक राणे व दिलीप मालवणकर यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments